रामराजे म्हणजे सातारा जिल्ह्याला लागलेली कीड : खासदार उदयनराजे भोसले 

रामराजे म्हणजे सातारा जिल्ह्याला लागलेली कीड : खासदार उदयनराजे भोसले 

सातारा : "तुमच्यासारख्या बांडगुळांमुळे फलटण शहरात नको त्या कुत्र्यांचे फावतंय. तुमच्यापैकी एकजण तयार व्हा, असा विश्‍वास देत कुठे मालोजीराजे अन्‌ कुठे हे... फलटणमधील एकमेव व्यक्ती ही जिल्ह्याला लागलेली कीड आहे. ही कीड घालवायची आहे. ते माझे नाव घेऊन टीका करत असतील तर माझे चॅलेंज स्वीकारा. तुमच्या फलटण शहरात आलोय. तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही,'' अशा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता दिला. 

खासदार उदयनराजे भोसले हे आज एका विवाह सोहळ्यासाठी फलटणला गेले होते. विवाह सोहळ्यानंतर त्यांनी माजी खासदार हिंदूराव निंबाळकर, सह्याद्री चिमणराव कदम, सुशांत निंबाळकर, डॉ. जे. टी. पोळ यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा केली. त्यानंतर येथील शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आमदार असो वा खासदार, लबाडी मला अजिबात परवडत नाही, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, की कोणीपण असो देत. या फलटणमध्ये खास करून एकच नाव काय घ्यायचे. या जिल्ह्याला लागलेली कीड जायची असेल तर फलटणमध्ये एकच माणूस आहे. ते माझे नाव घेऊन टीका करत असतील तर माझे चॅलेंज स्वीकारा. तुमच्या फलटण शहरात आलोय. तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. केव्हाही सांगा, कुठेही सांगा. तुम्ही लोकांनी त्यांना मोठे केले आहे. तुम्ही धरसोड करता म्हणून हे लोक मोठी होतात. लोकशाहीत कोणीही आमदार व खासदारकीला उभे राहू शकते. हिंमत असेल तर अजमावून बघा. त्यापूर्वी प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. 

सातारा जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले. चळवळी निर्माण केल्या, स्वातंत्र्य असेल स्त्री शिक्षण, प्रतिसरकार असेल, सत्यशोधक चळवळी निर्माण झाल्या. ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर आमच्या येथील शाळेत शिकले. असे असताना त्यांनी बिनबुडाचे आरोप करून मला बदनाम करतात, हे अशोभनिय आहे. प्रत्येकाची सहनशीलता असते. माझी सहनशीलता आभाळाएवढी आहे. त्यामुळे हे सर्व मी सहन करतो. बाकीच्यांनी काय केले. सर्वजण माझ्यावर प्रेम करतात. त्याला मी जबाबदार नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचे असते. पण कसे जायचे व का जगायचे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मी विचार केला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मी लबाडी केलेली नाही. हिंमत असेल तर कोणत्याही व्यासपीठावर बोलवा. मी सडेतोड उत्तर द्यायला तयार आहे, असा इशारा देत उदयनराजे म्हणाले, की तुमच्यासारख्या बांडगुळामुळे फलटण शहरात नको त्या कुत्र्यांचे फावतंय. तुमच्यापैकी एकजण तयार व्हा. मग बघा काय होतय ते. कुठे मालोजीराजे अन्‌ कुठे हे... त्यांच्या नंतर मी न बोललेले बरे. त्यांच्याशी आमचे नाते आहे, तरीही तरीही मी बोलतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com