Satara : Udayan Raje and two old Ladies | Sarkarnama

वृध्द महिला...उदयनराजे अन्‌ डोळ्यातील अश्रू 

सरकारनामा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सातारा  : मी कोणताही पक्ष मानत नाही. जनता हाच माझा पक्ष असे साताऱ्याचे खासदार उदयनराजे नेहमी म्हणतात. याचा प्रत्यय आज जलमंदीर या निवासस्थानातून कार्यक्रमासाठी निघालेल्या उदयनराजेंना आला. 

सातारा  : मी कोणताही पक्ष मानत नाही. जनता हाच माझा पक्ष असे साताऱ्याचे खासदार उदयनराजे नेहमी म्हणतात. याचा प्रत्यय आज जलमंदीर या निवासस्थानातून कार्यक्रमासाठी निघालेल्या उदयनराजेंना आला. 

दोन वृध्द महिला हातात शाल व श्रीफळ घेऊन गेट जवळ थांबलेल्या दिसल्या. त्यांनी थांबून त्यांची चौकशी केली. त्या वृध्द महिला म्हणाल्या, महाराज तुमच्या एका शब्दावर आमच्या मुलाचे काम झाले. आता आमचे कुटुंब देखील व्यवस्थित चालू लागले आहे. तुम्हाला भेटून आभार मानायला एवढ्या लांबून आलो आहोत, असे सांगत त्या वृध्द महिलेने हातातील शाल व श्रीफळ खासदार उदयनराजेंच्या हातात दिले. 

महाराजांनीही वृध्देची ती भेट स्वीकारली. बघता बघता वृध्देच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या महिलांची नवे मात्र कळू शकली नाहीत . खासदार उदयनराजे भोसले हे सर्वसामान्यांसाठी नेहमी धावून जातात. प्रसंगी आपला बडगा दाखवून गोरगरिबांची कामे ते करून देतात. 

संबंधित लेख