satara two mla touch with bjp | Sarkarnama

साताऱ्यातील दोन आमदार भाजपच्या संपर्कात; कॉंग्रेस-सेनेला झटका बसणार? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

सातारा जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदार भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदार भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

कराड शासकीय विश्रामगृहात श्री. पावसकर यांनी राजकीय विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. जिल्हाध्यक्ष होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा एकही पदाधिकारी नव्हता. आज जिल्हयात भाजपचे दोन नगराध्यक्ष, 41 नगरसेवक, सात जिल्हा परिषद सदस्य, 14 पंचायत समिती सदस्य, 91 सरपंच तर 630 ग्रामपंचायत सदस्य आहेत. जिल्ह्यात मतांच्या सरासरी टक्केवार पाहता भाजप क्रमांक दोनचा पक्ष आहे. भाजपमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग वाढले आहे. 

जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारही पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्याबाबत नोव्हेंबरमध्ये महत्वपूर्ण राजकीय घडामोड पहायला मिळेल. लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रितपणे फेब्रुवारी 2019 लो होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी भाजप सज्ज आहे. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निश्‍चितपणे निवडून येतील. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, सातारा व कोरेगाव या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात आले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे पावसकर म्हणाले. 

संबंधित लेख