satara tense in mayni | Sarkarnama

मायणीत तणाव, जलद कृती दल तैनात!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

केबल चालकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय सूडबुद्धीने केला असल्याचा दावा गुदगे समर्थकांनी केला आहे. या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुदगे समर्थक व ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला. गुदगे विरोधकांनी दिलेली मायणी बंदची हाक व ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती. 

मायणी (सातारा) : येथील केबल चालकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय सूडबुद्धीने केला असल्याचा दावा गुदगे समर्थकांनी केला आहे.

या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुदगे समर्थक व ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला. गुदगे विरोधकांनी दिलेली मायणी बंदची हाक व ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती. 

मायणी येथील दोस्ती केबलचे मालक मोहन जाधव यांनी काल सोमवार (ता.26 ) रोजी विषारी औषध पिवून आत्महत्या केली. त्यांना सुरेंद्र गुदगेंनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद जाधव यांचा मुलगा राजाराम यांनी मायणी पोलिसांत दिली होती. विरोधकांनी राजकीय सुडबुद्धीने गुदगेंवर फिर्याद दिल्याचा आरोप करत गुदगे समर्थकांनी आज निषेध मोर्चा काढला. 

सकाळी अकरा वाजता मायणी अर्बन बॅंकेजवळ शेकडोंचा जनसमुदाय जमा झाला. काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा देत बॅंकेपासून मोर्चास सुरवात झाली. मोर्चात ग्राम तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुधाकर कुबेर, बॅंकेचे उपाध्यक्ष दीपक देशुमख, संचालक ऍड. सुनील गंबरे, भाऊसाहेब लादे, रणजीत माने, शैलेंद्र वाघमारे, अरुण सुरमुख, अनिल माळी, प्रा. सदाशिव खाडे, प्रमोद बर्गे, विकी सकट, दादासाहेब निकम, शरद निकम, हेमंत जाधव, दादासाहेब कचरे, महादेव माळी, प्रतिभा माळी, माधुरी तावरे, छाया सुरमुख आदी सहभागी झाले होते. 

मोर्चेकऱ्यांनी पोलिस दूरक्षेत्र आवारात ठाण मांडून भावना व्यक्त केल्या. दरम्यान, गावातील तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने जलद कृती दलाला पाचारण केले होते. 

 

संबंधित लेख