satara surendra gudage bell rejected | Sarkarnama

NCP नेते सुरेंद्र गुदगे यांचा अटकपुर्व फेटाळला 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

मायणी ( ता.खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज वडूज न्यायालयाने फेटाळला. 

सातारा : मायणी ( ता.खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज वडूज न्यायालयाने फेटाळला. 

मायणी येथील केबल व्यवसायिक मोहन जाधव यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली होती. जाधव यांच्या नातेवाईकांनी सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या मध्ये जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हंटले होते. तणावपूर्ण वातावरणात गुदगे यांच्या विरोधात मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुदगे यांनी वडूज येथील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

त्यावर आज सुनावणी झाली. या मध्ये सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता नितीन गोडसे व बचाव पक्षातर्फे अँड. मुकुंद सारडा यांनी काम पाहिले. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून सुरेंद्र गुदगे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. 

संबंधित लेख