satara sp silent | Sarkarnama

"उदयनराजे शो' : सातारा एसपींच्या मौनाचे गुपित काय ? 

उमेश बांबरे 
सोमवार, 24 जुलै 2017

खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले मागील शुक्रवारी साताऱ्यात आले आणि त्यांनी "रोड शो' केला. पण पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली नाही. यावरून पोलिस प्रशासनावर टीका सरु आहे. दुसऱ्या बाजूला अटक टाळण्यामागची भूमिका सांगायला पोलिस अधीक्षक संदीप पाटील तयार नाहीत. गेली तीन दिवस त्यांनी मोबाईलवरून संपर्क टाळला आहे. एसपींचे हे मौन नेमके कशासाठी, असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. 

सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळलेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले मागील शुक्रवारी साताऱ्यात आले आणि त्यांनी "रोड शो' केला. पण पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली नाही. यावरून पोलिस प्रशासनावर टीका सरु आहे. दुसऱ्या बाजूला अटक टाळण्यामागची भूमिका सांगायला पोलिस अधीक्षक संदीप पाटील तयार नाहीत. गेली तीन दिवस त्यांनी मोबाईलवरून संपर्क टाळला आहे. एसपींचे हे मौन नेमके कशासाठी, असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. 

उदयनराजेप्रकरणात कायदा सर्वांना समान मग पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली, हा प्रश्‍न सर्वांना सतावू लागला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर एकमेव व्यक्तीकडे आहे, ते म्हणजे साताऱ्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कारवाई टाळण्याले सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात खरे कारण गुलदस्त्यात आहे. त्याची माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे मिडियाने सातत्याने पाठपूरावा सुरू ठेवला आहे. पण श्री. पाटील कोणाचाच मोबाईल स्वीकारत नाहीत. त्यांनी या विषयी मौन धारण करणे हाच उपाय शोधला आहे. त्यांच्या या मौनामागचे नेमके गुपित काय, या प्रश्‍नाने सातारकरांच्या मनात घर केले आहे. खासदार उदयनराजे भोसले येत्या दोन चार दिवसांत पोलिसांत येऊन स्वत:हून हजर होणार, अशी चर्चा त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे पोलिसांची रोड शो वेळी असलेली आशा आजही कायम आहे. 

संबंधित लेख