satara shivsena organise meeting in mumbai | Sarkarnama

शिवसेना साताऱ्यातील लढाईचे रणशिंग मुंबईत फुंकणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सातारा : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यात शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. बुथनिहाय बांधणीवर भर दिला आहे. आता मुंबईतील साताकरांशी संपर्क साधून त्यांची मते पदरात पाडुन घेण्यासाठी मुंबईतील सातारकरांसाठी येत्या सोमवारी शिवसेना भवनात मेळावा होणार आहे. येथूनच शिवसेनेचे नेते लोकसभेचे रंणशिंग फुंकणार आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भुमिका यापूर्वीच जाहिर केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व सातारा, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी हर्षद कदम, चंद्रकांत जाधव आणि राजेश कुंभारदरे यांच्या मदतीने जिल्ह्यात बुथनिहाय बांधणी केली आहे. तसेच कॉंग्रेस, भाजपमधील नाराजांना शिवसेनेत घेऊन पक्षाची ताकद वाढवत आहेत. 

माजी आमदार सदाशिव सपकाळ यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुन्हा शिवसेनेत घेतले आहे. आता पुढचा टप्पा म्हणून मुंबईत व्यवसाय व नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या सातारकरांसाठी शिवसेने मेळावा घेऊन त्यांना भगव्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (ता.29) शिवसेना भवन मुंबई येथे मुंबईतील सातारकरांचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. 

या मेळाव्यास परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, माजी आमदार व शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक दगडुदादा सपकाळ, माजी आमदार सदाशिव सपकाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. 

संबंधित लेख