satara shivsena | Sarkarnama

शिवसेना ग्रामपंचायतींच्या आखाड्यात उतरणार! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सातारा  जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम सुरू असून सर्व ग्रामपंचायतीत शिवसेना पक्ष शिवसेना ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. 

सातारा : जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम सुरू असून सर्व ग्रामपंचायतीत शिवसेना पक्ष शिवसेना ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. 

खटाव-माण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज दहिवडी येथे शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी जिल्हा उपप्रमुख संजय भोसले, तालुकाप्रमुख युवराज पाटील, रामभाऊ जगदाळे, बाळासाहेब मुलाणी, विधानसभा संघटक सचिन भिसे, किसनराव नलवडे, म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरूळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. जाधव म्हणाले, निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने तयारीला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तंतोतंत पालन करून शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची आहे. ज्या ठिकाणी ताकद आहे तेथे संपूर्ण पॅनेल उभे करावे. तसेच सरपंच पदासाठी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असले. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र आहे. तळागाळातील जनतेच्या हिताचे रक्षण करण्याची शिकवण आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेची बांधिलकी थेट जनतेशी असून त्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करत आली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख