satara shivendrasinh raje | Sarkarnama

महाराष्ट्र स्कूटर्ससाठी शिवेंद्रसिंहराजेंचे मुख्यमंत्री व पवार यांना साकडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

सातारा : साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निमिर्तीची गरज लक्षात घेता येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्‍यक आहे. सरकारने या कंपनीच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयामधील अपील माघारी घ्यावे. तसेच शासनाने सकारात्मक निर्णय घेवून ही कंपनी त्वरीत सुरु करावी, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदर शरद पवार यांना निवेदन दिले आणि या विषयावर सविस्तर चर्चाही केली. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान-लहान उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. हे लहान - लहान उद्योग सुरु झाल्यास साताऱ्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे. 

महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु झाल्यास सातारा येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाकडील अपील माघारी घ्यावे. याबाबत श्री. बजाज यांच्याशी चर्चा व वाटाघाटी करुन शासनस्तरावर महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट लवकरात लवकर सुरु व्हावा, याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेणेबाबत आपण दोघांनी लक्ष घालावे आणि औद्योगिकरण आणि बेरोजगारीशी निगडीत प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. 

याबाबत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु होण्यासाठी आपण योग्य ते सहकार्य करु असे आश्‍वासन दोघांनीही शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आहे. यावेळी मासचे अध्यक्ष राजेश कोरपे, धैर्यशील भोसले, राजेंद्र रानडे यांच्यासह मासचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

संबंधित लेख