satara shetkari samp | Sarkarnama

शेतकरी संपाला दोन्ही कॉंग्रेसची साथ 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जून 2017

शुक्रवारपासून बंदला प्रतिसाद वाढण्याची शक्‍यता असून भाजीपाल्याचे दर कडाडण्याची भिती व्यक्त होत आहे. 
पोलिसांकडून शेतकरी संघटनांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी केला आहे. 

सातारा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. टॅंकरची मोडतोड, दूध ओतून केलेला निषेध आणि बाजार समितींत नवीन माल न आल्याने व्यवहार ठप्प झाले. संपाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या सर्व बाजारसमित्या बंद होत्या. आंदोलनात चार शेतकरी संघटनांना राष्ट्रवादी व कॉंग्रेसची छुपी साथ मिळाली. 

रात्रीपासूनच कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरवात केली. रात्री उशीरा दूध घेऊन जाणारे टॅंकर अडवून त्यांच्या काचा फोडल्या. तर पहाटे दूध घेऊन शहराकडे येणाऱ्या गाड्या पुन्हा परत गावाकडे पाठविण्याचे काम कार्यकर्ते करत होते. संपाचा सर्वात मोठा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. काही अपवाद वगळता शेतकरी तसेच दुध संस्थांनी विक्री व संकलन बंद ठेवले. दुध वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या साताऱ्यात काचा फोडण्यात आल्या. 

संपामुळे कऱ्हाड, सातार, फलटण बाजार समितीत व्यवहार बंद होते. सातारा व वाई बाजार समितीत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी भाजीपाल्याची आवक झाली. कऱ्हाडमध्ये दूध टॅंकर अडविल्याच्या कारणांवरून बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा आघडीाचे विश्‍वास जाधव, बाळासाहेब मोहिते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

 

संबंधित लेख