satara sharad pawar on udyanraje | Sarkarnama

उदयनराजेंना मी दिल्लीत पाहतो, ते लोकप्रिय आहेत : पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

"आजचा हा कार्यक्रम जन्मदिन सोहळा नाही तर, उदयनराजेंनी तो सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील परिवर्तनाचा सोहळा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी रयतेचा विचार केला याचा मनापासून आनंद आहे.', असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. 

सातारा : "आजचा हा कार्यक्रम जन्मदिन सोहळा नाही तर, उदयनराजेंनी तो सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील परिवर्तनाचा सोहळा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी रयतेचा विचार केला याचा मनापासून आनंद आहे.', असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, आजचा हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. या घराण्याने कायम रयतेचा विचार केला याचा आम्हाला आनंद आहे. दहा वर्षे ते सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. तुम्ही त्यांना जिल्ह्यात व राज्यात पहात असाल. पण मी त्यांना दिल्लीत पहातो. सर्व खासदारांना उदयनराजेंविषयी औत्सुक्‍य आहे. ते सर्व सदस्यांत लोकप्रिय असून ते दिल्लीत कमी बोलतात. सातारा व महाराष्ट्रातील प्रश्‍नांची मांडणी ते करतात. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना उदयनराजे लोकांच्या हृदयात बसले आहेत. लोकहितासाठी ते कोणाची तमा बाळगत नाहीत. आज येथे जमलेली गर्दी त्याची साक्ष आहे 

महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजची विकासकामे सातारचा चेहरा मोहरा बदलणारी आहेत. वाढदिनी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांनी राज्याचे, देशाचे नेतृत्व करावे. त्यांनी आम्हाला सांगावे, निरोप द्यावा, आम्ही त्यांच्याकडे जाऊ, अशी आमची इच्छा असते. 
 

संबंधित लेख