Satara : Sharad Pawar checking for alternative candidate | Sarkarnama

साताऱ्यात लोकसभेची गणिते जुळविण्यासाठी  पवारांची चाचपणी 

उमेश बांबरे - सरकारनामा  वृत्त 
मंगळवार, 9 मे 2017

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साताऱ्यात आलेत आणि राजकिय घडमोडी झाल्या नाहीत, असे होणार नाहीत. या घडामोडी अगदी स्पष्टपणे कधीच कोणाच्या लक्षात येत नाहीत. पण पुढील काळात त्याचे राजकिय पडसाद निश्‍चितपणे पहायला मिळतात.

सातारा : लोकसभेसाठी सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी साताऱ्यातील दौऱ्यात केली.

प्रत्येक आमदाराच्या मनातील खासदारकीच्या उमेदवाराचा चेहरा जाणून घेतला. 

आगामी काळात पोटनिवडणुकीची वेळ आल्यास सर्वांचे एकमत होणाऱ्या चेहऱ्यालाच तिकिट दिले जाणार आहे. सध्यातरी
फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे यांची नावे पुढे असली तरी ऐनवेळी वाई तालुक्‍यातून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साताऱ्यात आलेत आणि राजकिय घडमोडी झाल्या नाहीत, असे होणार नाहीत. या घडामोडी अगदी स्पष्टपणे कधीच कोणाच्या लक्षात येत नाहीत. पण पुढील काळात त्याचे राजकिय पडसाद निश्‍चितपणे पहायला मिळतात.

 शरद पवारांनी साताऱ्यात आल्यावर आमदारांशी चर्चा केली. यात
प्रत्येक आमदारांच्या मनात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणाचा चेहरा आहे, हे त्यांनी जाणून घेतले. त्यासाठी लोकसभेसाठी सातारा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती राहिल, या साध्या प्रश्‍नातून त्यांना अनेक उत्तरे मिळाली.

प्रत्येकांने आमदाराने आपले मत मांडले. यातून कोणाएकाच्या नावावर एकमत होते का याची चाचपणी श्री. पवार यांनी केली.

 आगामी काळात पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास पवार या सर्वांच्या मनात असलेल्या चेहऱ्यालाच
तिकिट देतील. पण त्यातूनही काही आजी-माजी नेत्यांनी आग्रह धरल्यास ऐनवेळी वाई तालुक्‍यातून नवीन चेहरा पुढे येण्याची शक्‍यता आहे. पण, खासदार उदयनराजे भोसले आगामी काही महिन्यात नेमकी काय भुमिका घेणार आणि शरद पवारांकडून ऐनवेळी कोणते फासे टाकले जातील, यावर या सर्व घडामोडीचे चित्र अवलंबून आहे.

संबंधित लेख