satara sandeep mozar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

संदीप मोझर यांच्या राजीनाम्याचे नेमके गमक काय?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदाचा संदीप
मोझर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्क
वर्तविले जात आहेत. 

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदाचा संदीप
मोझर यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्क
वर्तविले जात आहेत. 

मुळात संदीप मोझर यांनी अल्पावधित साताऱ्यातील मनसे
जाण आणली होती. राज ठाकरे यांची सभा घेऊन जिल्ह्यात मनसेची चांगलीच
वातावरण निर्मिती केली होती. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्यातील
मनसेच्या इंजिनाला पुन्हा नवा नेता शोधावा लागणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बऱ्यापैकी युवक
वर्ग जोडला गेला आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे युवक मनसेत सक्रिय आहेत.
मनसेला सुरवातीपासून जिल्ह्यात सक्षम नेतृत्व मिळाले नाही. मिळाले तर ते
टिकले नाही. प्रत्येक वेळी जिल्ह्यातील नेतृत्वावर टिका झाली.

मध्यंतरीच्या कालखंडात संदीप मोझर यांच्याकडे मनसेची धुरा आली. अल्पावधित
त्यांनी पक्षाची केलेली बांधणी आणि युवकांचे संघटन पाहून त्यांना
मनसेच्या राज्य उपाध्यक्ष पदाची धूरा देण्यात आली. 

सातारा लोकसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणुक तरूंगातून लढविली होती. मनसेचे मोठे पद त्यांच्याकडे होतेच, या शिवाय नुकताच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शेतकरी व पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता.

मेळाव्याचे यश पाहता ते यावेळेस सातारा लोकसभा लढणार हे निश्‍चित झाले होते. पण हे सर्व होण्याआधीच त्यांनी काल पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला. यापुढे कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांची सामाजिक चळवळ व विविध आंदोलने मात्र, पुढे सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

मध्यंतरी बाळा नांदगावकरांबाबत साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी विरोधात भुमिका घेतली होती. त्यावेळीच श्री. मोझर यांना मनसे सोडण्याची सूचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिली होती. पण मोझर यांनी त्यानंतरही राज ठाकरेंचा दौरा जिल्ह्यात यशस्वी केला. त्यांच्या राजीनाम्यामागे नेमके गमक काय हेच कळून येत नाही.

संदीप मोझर यांच्या या राजीनाम्यामुळे मनसेचे इंजिन नेत्याविना पोरके झाले आहे. आता मनसेच्या साताऱ्यातील इंजिनासाठी राज ठाकरेंना नव्या नेत्याचा शोधावा घ्यावा लागणार आहे.

संबंधित लेख