'माढा' स्वाभिमानीचा बालेकिल्ला; लढून जिंकून दाखवणार : तुपकर 

'माढा' स्वाभिमानीचा बालेकिल्ला; लढून जिंकून दाखवणार : तुपकर 

सातारा : माढा मतदारसंघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे. येथून आम्ही ताकतीने लढणार असून जिंकूनही दाखविणार आहोत. पक्ष, संघटना जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सर्व शेतकरी असतील. संघटनेने परवानगी दिली तर मी स्वत: माढ्यातून लढण्यास तयार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. 

येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते मांडली. सातारा लोकसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. तुपकर म्हणाले, खासदार राजू शेट्टींनी देशभर दौरा करून 190 शेतकरी संघटना एकत्र केल्या आहेत. देशपातळीवरील संघटनांनी शेट्टीसाहेबांचे नेतृत्व मान्य केले आहे. आतापर्यंत भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप पाहिला आहे. लवकरच देशव्यापी शेतकरी संपालाही मोदींना सामोरे जावे लागेल. सध्यातरी आम्ही सर्वच पक्षांपासून समान अंतरावर आहेत. कोणाशी युती, आघाडीचा सध्यातरी प्रश्‍न नाही. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना आता नवा संघर्ष या सरकारच्या विरोधात सुरू करत आहेत. स्थानिक प्रश्‍नांना घेऊन आम्ही अधिक आक्रमक होणार असून लवकरच ऊस दराशी संबंधित मोर्चा जिल्ह्यात निघेल. त्यानंतर गनिमी कावा आंदोलन साताऱ्यात केले जाईल. संघटनेतील मरगळ झटकून आम्ही कामाला लागणार आहोत, असे तुपकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com