satara ramraje jaykumar gore healthy meet | Sarkarnama

वादासाठी प्रसिद्ध असलेले रामराजे- जयकुमार गोरे रमले हास्यविनोदात! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मातीतल्या पैलवानाच्या सत्काराला राजकारणाच्या फडातील दोन कसलेले मल्ल एकत्र पाहण्याचा योग माणच्या जनतेला अनेक दिवसांनंतर आला. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व अर्जुन पुरस्कार विजेती ललिता बाबर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच आमदार जयकुमार गोरे एकाच व्यासपीठावर एकाच कोचवर बसले. अन्‌ उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

मलवडी (सातारा) : मातीतल्या पैलवानाच्या सत्काराला राजकारणाच्या फडातील दोन कसलेले मल्ल एकत्र पाहण्याचा योग माणच्या जनतेला अनेक दिवसांनंतर आला. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व अर्जुन पुरस्कार विजेती ललिता बाबर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच आमदार जयकुमार गोरे एकाच व्यासपीठावर एकाच कोचवर बसले. अन्‌ उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व अर्जुन पुरस्कार विजेती ललिता बाबर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. दोघांची खडाजंगी संपूर्ण जिल्ह्याने अनुभवली आहे. दोघांच्यातून विस्तवही जात नसल्याने हे दोघे एका व्यासपीठावर येणार का? याची उत्सुकता होती. पण, हे दोघे एका व्यासपीठावर आले एवढेच नव्हे तर एकाच कोचावर बसले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे दोघे जवळ बसूनही एकमेकांकडे बघतही नव्हते. त्यामुळे बोलणे तर दूरच. हा अबोला बराचवेळ टिकला. पण त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलले नव्हे तर त्यांच्यात हास्यविनोदही रंगला. या कार्यक्रमात राजकीय टिकटिप्पणी होईल अशी आशा असलेल्यांचा भ्रमनिरास झाला. 

राजकारणाचा विषय कोणीही आपल्या भाषणात काढला नाही. रामराजे व जयकुमार गोरे यांना एकत्रित बघून राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. 

संबंधित लेख