satara-raja-bhaiya-meets-udayanraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

छत्रपती शिवराय आमचे दैवत : आमदार राजा भैय्या 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांना देव मानणारे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रघुराज प्रतापसिंह (राजा भैय्या) यांनी आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची येथील शासकिय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. दोघा नेत्यांनी साधारण 20 मिनिटे चर्चा केली. 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांना देव मानणारे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रघुराज प्रतापसिंह (राजा भैय्या) यांनी आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची येथील शासकिय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. दोघा नेत्यांनी साधारण 20 मिनिटे चर्चा केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ल्यांबाबत राजा भैय्या यांना खूप आप्रुप आहे. यापूर्वी रायगडावर त्यांनी दोन वेळा भेट दिली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडबद्दल त्यांना फारच आकर्षण आहे. हा किल्ला पाहून तेथील भवानीमातेचे दर्शन घेतल्यानंतर ते कोरेगाव तालुक्‍यातील साप गावी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मुक्कामी आले होते. आज सायंकाळी पाच वाजता त्यांनी येथील शासकिय विश्रामगृहात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशजांना भेटून आपल्याला आनंद झाल्याची भावना राजा भैय्या यांनी व्यक्त केली. राजा भैय्यांसमवेत आलेल्या मित्रांनी भैय्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची दररोज पुजा केली जाते, असे उदयनराजेंना सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. यानंतर उदयनराजेंनी सातारी कंदीपेढे व छत्रपतींची प्रतिमा देऊन राजा भैय्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत चित्रपट सृष्टीतील मान्यवरांसह संग्राम बर्गे, गणेश जाधव आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख