satara premalatai shalinitai story | Sarkarnama

प्रेमलाताई...शालिनीताई...कांताताई...तिघींनी राजकारण गाजवले! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

दिवंगत प्रेमलाताई चव्हाण, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील आणि माजी आमदार कांताताई नलवडे या तीन महिलांनी राज्यातील राजकारणावर आपला ठसा ठळकपणे उमटवला. सद्यस्थितीत साताऱ्यात मात्र महिला नेतृत्वाची वानवा दिसत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील महिला राजकिय पातळीवर मागे पडल्याचे दिसत आहे. 

सातारा : दिवंगत प्रेमलाताई चव्हाण, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील आणि माजी आमदार कांताताई नलवडे या तीन महिलांनी राज्यातील राजकारणावर आपला ठसा ठळकपणे उमटवला. सद्यस्थितीत साताऱ्यात मात्र महिला नेतृत्वाची वानवा दिसत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील महिला राजकिय पातळीवर मागे पडल्याचे दिसत आहे. 

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या साताऱ्यात लोकसभा आणि विधानसभेला एकही महिला लोकप्रतिनिधी नाही. मात्र काही वर्षापर्यंत साताऱ्याच्या महिला नेतृत्वाचा ठसा राज्यभर होता. महाराष्ट्र राज्यर्निर्मीतीनंतर काहीकाळ माण या राखीव मतदारसंघातून प्रभावती सोनावणे या आमदार होत्या. मात्र त्यांचा प्रभाव मर्यादित होता. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातुश्री प्रेमलताई चव्हाण यांनी राज्याचे राजकारण एकेकाळी गाजवले. त्या इंदिरा गांधीच्या निष्ठावान होत्या. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदही भूषवले होते, तसेच त्या खासदारही होत्या. प्रेमलताई व त्यानंतर पृथ्वीराज यांच्या माध्यमातून कऱ्हाडने राज्याचे नेतृत्व केले. 

माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी 90 च्या दशकात कोरेगाव मतदारसंघातून नव्याने राजकारणाची सुरुवात केली. 1999 आणि 2004 ला त्या राष्ट्रवादी पक्षातून आमदार झाल्या. वेगवेगळ्या विषयावर त्या रोखठोक मते मांडत. आर्थिक निकषावरील आरक्षणाच्या संबंधाने त्यांनी राज्यभर रान उठवले होते. स्वत:च्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. 

वाढे (ता. सातारा) येथील कांताताई नलावडे यांनी भाजपमध्ये मोठे संघटनात्मक काम केले आहे. त्या अखिल भारतीय पातळीवर महिला संघटनेच्या प्रमुख होत्या. त्यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती. 
 

संबंधित लेख