राष्ट्रवादी विरोधात  शंभूराजेंच्या मोर्चेबांधणीत काँग्रेस सहभागी होईल का ?

कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीच भुमिका जाहीर नसली तरी ऐनवेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार की भाजप, सेना युतीशी हात मिळविणी करणार याची उत्सुकता आहे.
Shambhuraj-Desa
Shambhuraj-Desa

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, शिवसेनेसह मित्र पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. 

 कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीच भुमिका जाहीर नसली तरी ऐनवेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार की भाजप, सेना युतीशी हात मिळविणी करणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरूध्द भाजप, सेना मित्रपक्ष अशी लढत पहायला मिळणार  का ?

लोकसंख्येच्या निकषानुसार यावेळेस नियोजन समितीच्या जागा वाढल्या आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखांहून अधिक असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या 32 वरून 40 झाल्या आहेत. यामध्ये ग्रामीण क्षेत्रातून 33, संक्रमणकालीन क्षेत्रात दोन, लहान नागरी क्षेत्रातून पाच अशा एकुण 40 जागा असतील. 

 यामध्ये आरक्षणानुसार निम्म्या महिला लक्षात घेता 20 जागा महिलांसाठी असतील. यामध्ये सर्वसाधारणसाठी 22 पैकी अकरा महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग 13 जागांपैकी सात महिला, अनुसूचित जातीच्या चार जागांपैकी दोन महिला तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक जागा असेल. 

जिल्हा नियोजनचे आठ सदस्य वाढले आहेत. या वाढलेल्या जागांमुळे या निवडणुकीकडे सर्वच पक्षांनी लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडित काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांना एकत्र करून राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकवटणार आहेत. त्यासाठी पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

 त्यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांशी चर्चा करण्यास सुरवात केली आहे. पण जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेसचे सदस्य आहेत. अद्याप कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोणतीच भुमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार की भाजप, शिवसेना युतीसोबत राहणार याची उत्सुकता आहे. त्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधकांची मोट बांधण्याची तयारी केली आहे. 

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 40, कॉंग्रेस सात, भाजप सात, शिवसेना दोन आणि आघाडीचे सात तर अपक्ष दोन आहेत. अपक्षापैकी खंडाळ्यातील अपक्षाने राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आहे. तर दुसरा शिवसेनेचा अपक्ष आहे. ही आकडेवारी पाहता राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने आमदार शंभूराज देसाईंची रणनिती राष्ट्रवादीला अडविण्यात यशस्वी होणार का, याचीच उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com