Satara Politics : Udayanraje Bhosale | Sarkarnama

 सत्तेचा उन्माद नको, सत्ता लोकांसाठी राबवा - उदयनराजे

उमेश भांबरे 
शनिवार, 3 मार्च 2018

सातारा :" सत्ता लोकांसाठी राबवा, सत्तेचा उन्माद करु नका, जनताबरोबर असली तर आणि तरच लोकप्रतिनिधींना किंमतआहे", अशा परखड शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सुनावले.

सातारा :" सत्ता लोकांसाठी राबवा, सत्तेचा उन्माद करु नका, जनताबरोबर असली तर आणि तरच लोकप्रतिनिधींना किंमतआहे", अशा परखड शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सुनावले.

परळी खोऱ्यातील लुमणेखोल ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या खासदार गटाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बबनराव देवरे, माजी सभापती सुनील काटकर, माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, भिकू भोसले, उरमोडी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, तुम्ही चांगलेच काम करणार यात शंका नाही. तुमच्या प्रत्येक कामातून गावाचा सर्वांगिण विकास साधला गेला पाहिजे. जनताबरोबर असली तर आणि तरच लोकप्रतिनिधींना किंमत आहे, असेही त्यांनी सुनावले.

यावेळी उदयनराजे गटाच्या बिनविरोध आलेल्या तसेच निवडणुकीत निवडुन आलेले सदस्य रंजना लाड, हणमंत राऊत, यांचेसह सरपंच कोमल भंडारे, सदस्य कलाबाई माने, कमल माने, संपत माने, किसन चिकणे यांचा सत्कार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला.

दरम्यान, जावली तालुक्‍यातील बेलावडे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचांसह सर्व सदस्य खासदार गटाचे निवडुन आले. तसेच कोंडवे, संभाजीनगर, खिंडवाडी येथील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीतही खासदार गटाचे सदस्य निवडून आले.

संबंधित लेख