Satara Politics BJP to fight gram Panchyat elections | Sarkarnama

भाजप सातारा जिल्ह्यात अडीचशे ग्रामपंचायतीत उमेदवार उभे करणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सातारा   : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने लक्ष घातले आहे. 319 ग्रामपंचायतींपैकी 250 ग्रामपंचायतीत भाजप उमेदवार उभे करणार आहे. 

त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट हे सर्व प्रकारची रसद पुरविणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर लढताना दिसणार आहे . 

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. आजपर्यंत स्थानिक पातळीवर कधीही पक्षांची चिन्हे पहायला मिळालेली नव्हती. पण यावेळेस जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडित काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी केली आहे.

त्यानुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी एका पदाधिकाऱ्यांवर दिली गेली आहे. येत्या दोन चार दिवसांत याबाबत बैठका होऊन उमेदवारांची निश्‍चिती करण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळेस राष्ट्रवादीच्या बरोबरीने भाजपनेही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले आहे. साधारण 250 ग्रामपंचायतीत भाजप उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसच्या स्थानिक नेते व पॅनेलमध्ये लढत पहायला मिळत होती. आता दोन कॉंग्रेसच्या सोबत भाजपचाही उमेदवार पहायला मिळणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या राबणाऱ्या यंत्रणेला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा संपर्क मंत्री गिरिश बापट हे सर्व प्रकारची रसद पुरविणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ग्रामपंचायत निवडणुक थोडी जड जाणार आहे. येत्या आठवड्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक होऊन त्यामध्ये उमेदवार निश्‍चिती होणार आहे. तर पुढील आठवड्यात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील व गिरिश बापट यांच्या बैठका होणार आहेत. 

संबंधित लेख