satara politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताच्या जवळ
भाजपनं छत्तीसगढ. राजस्थान गमावले
मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत
छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे, भाजप - 108 कॉंग्रेस - 106
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट

कार्यकर्ते शोधतात पत्रक काढण्याची संधी! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

दोन्ही राजांमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष आता कार्यकर्त्यांच्यातही मूळ धरू लागला आहे. दोन्ही गटातील निष्ठावंत कार्यकर्ते कोणता मुद्दा सापडतोय आणि कधी एकदा पत्रक काढतोय, याची वाट पाहत आहेत. 

सातारा : सातारा पालिका निवडणुकीपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याचे मनोमीलन तोडून सामान्य कुटुंबातील माधवी कदम यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजेंच्या विरोधात नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले. त्यानंतर या दोन्ही राजांमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष आता कार्यकर्त्यांच्यातही मूळ धरू लागला आहे. दोन्ही गटातील निष्ठावंत कार्यकर्ते कोणता मुद्दा सापडतोय आणि कधी एकदा पत्रक काढतोय, याची वाट पाहत आहेत. 

खंडणी प्रकरणात उदयनराजेंचे नाव गोवण्यात आल्याचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना खासदार समर्थकांनी दिले. त्या निवेदनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नावे टाकून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर आमदार भोसले यांचे निष्ठावंत जयेंद्र चव्हाण त्यास पत्रकाव्दारे मुहतोड जबाब देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापूर्वी पालिकेतील विस्कळित पाणी पुरवठ्याचा आधार घेत नगर विकास आघाडी पार्टीचे गट नेते अमोल मोहिते यांनी सत्तारूढ सातारा विकास आघाडीवर पत्रकाव्दारेच शरसंधान केले. प्रतिउत्तरास पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनीही पालिकेची बाजू उचलून धरली. या पत्रक नाट्यात एकेकाळी उदयनराजेंचे निष्ठावान म्हणून वावरणाऱ्या व सध्या मनसेचे राज्य उपाध्यक्ष असलेले संदीप मोझर यांनीही उडी मारली आहे. मोझर ही उदयनराजेंच्या विरोधात तोंडसुख घेत आहेत. या सर्व घडामोडींवर दोन्ही गटातील कार्यकर्ते लक्ष ठेवून असून ते देखील सोशल मिडियावर असलेल्या आपापल्या ग्रुपमध्ये आपल्या नेत्याविषयीचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. या सर्व पत्रकबाजीतून राजकीय गर्मी वाढली आहे. 
 

संबंधित लेख