उदयनराजेंच्या सत्तेविरोधात शिवेंद्रसिंहराजेंचे 'चक्री उपोषण'! 

उदयनराजेंच्या सत्तेविरोधात शिवेंद्रसिंहराजेंचे 'चक्री उपोषण'! 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असलेल्या सातारा पालिकेत आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीने चक्री उपोषण सुरू केले. या आंदोलनात स्वत: शिवेंद्रसिंहराजे ही सहभागी झाले. त्यांनी पालिकेतील कारभारावर सडेतोड टीका केली. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार, अंतर्गत रस्त्यांचे पॅचिंग, स्ट्रीट लाईट, अभयसिंहराजे उद्यानाची दुरवस्था, विरोधी नगरसेवकांची कामे अडवणे, वॉर्ड फंड खर्ची टाकण्यासाठी मान्यता न देणे आदींबाबत आंदोलन करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने पालिकेतील प्रमुख विरोधक नगर विकास आघाडने आजपासून पालिकेच्या दारात नगराध्यक्षा व सत्तारूढ सातारा विकास आघाडी विरोधात चक्री उपोषण सुरू केले. 

याविषयी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पालिकेत भ्रष्टाचार झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. पालिकेचे सीओंपुरता हा भ्रष्टाचार सिमित नसून त्यापुढेही गेला आहे. अध्यक्षांना बाजूला ठेऊन बिले काढली गेली आहेत. या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री येत्या शनिवारी साताऱ्यात येणार आहेत त्यावेळी आम्ही याबाबत निवेदन देणार आहोत. डॉ. दाभोलकरांच्या पुरस्काराचाही आघाडीच्या नेत्यांना विसर पडला आहे. या सर्व बाबींच्या विरोधात आमची आघाडी हे चक्री उपोषण करत आहे. आता निर्णय झाल्याशिवाय आमचे हे आंदोलन थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com