satara palika meeting | Sarkarnama

नगरसेवकाच्या पाठीवर "एलईडी बल्ब'! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

"विषय आहे खोल खोल.. बजेटचा आवाज वाजेना ढोल ढोल...सर्वसामान्यांची खुलली पोल पोल, जबाबदारीचा होणार तुमच्याकडून झोल झोल...' अशी आगळी वेगळी कविता, एका कन्स्ट्रक्‍शनला काळ्या यादीत घाला तसेच मुख्याधिकाऱ्यांसंदर्भात मजकूर असलेल्या फ्लेक्‍सचा शर्ट घालून नगरसेवक बाळासाहेब खंदारे सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आले.

सातारा : "विषय आहे खोल खोल.. बजेटचा आवाज वाजेना ढोल ढोल...सर्वसामान्यांची खुलली पोल पोल, जबाबदारीचा होणार तुमच्याकडून झोल झोल...' अशी आगळी वेगळी कविता, एका कन्स्ट्रक्‍शनला काळ्या यादीत घाला तसेच मुख्याधिकाऱ्यांसंदर्भात मजकूर असलेल्या फ्लेक्‍सचा शर्ट घालून नगरसेवक बाळासाहेब खंदारे सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आले. त्यांची वेशभूषा सर्वांचे लक्षवेधत होती. 

रस्त्यांवरील नादुरूस्त, उघडझाप करणारे एलईडी बल्बकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चक्क बॅटरीला लावलेला एक एलईडी दिवा पाठीवर अडकवून ते सभागृहात आले. त्यांची आजची वेषभूषा सभागृहात लक्षवेधी ठरली होती. सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. तर श्री. खंदारे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत. 
 

संबंधित लेख