satara news - shivendrasinh workers get together at `Suruchi' | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थक एसपी ऑफिसवर आज धडकणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थांनी सुमारे दोनशे ते अडीचशे समर्थक जमले आहेत. आमदारांसह हे समर्थक थोड्याच वेळात पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाऊन `आम्हा सर्वांनाच अटक करा,' अशी मागणी करणार आहेत. 

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थांनी सुमारे दोनशे ते अडीचशे समर्थक जमले आहेत. आमदारांसह हे समर्थक थोड्याच वेळात पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाऊन `आम्हा सर्वांनाच अटक करा,' अशी मागणी करणार आहेत. 

केवळ आमदार समर्थकांचेच पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्याने शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक संपप्त झाले आहेत. सध्या साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने समर्थक आमदारांच्या निवासस्थानातच थांबले आहेत. पोलिसांनी आमदार व खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

खासदार व आमदार समर्थकांतील धुमश्‍चक्रीच्या घटनेनंतर आज तिसऱ्या सातारा शहरात शांततेचे वातावरण आहे. पण आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे निवासस्थान सुरूची व खासदारांचे निवासस्थान जलमंदीर पॅलेसकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरेकेटस्‌ लावून बंद केले आहेत. त्यामुळे या परिसरात राहणारे नागरीक आणि आर्यांग्ल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रूग्णांना पायपीट करावी लागत आहे. कोणत्या प्रकारची वाहने या रस्त्यावरून सोडली जात नाहीत. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे.

संबंधित लेख