Satara NCP politics Ajit Pawar to pacify Shekhar Gore | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अजित दादा काढणार शेखर गोरेंची समजूत 

सरकरनामा ब्युरो
शनिवार, 22 जुलै 2017

सातारा  : माण-खटाव तालुक्‍यात जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने लक्ष घालू नये, नियोजन समितीवर तीन जागा आणि जिल्हा  बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याच्या अटीवर शेखर गोरेंनी बंड मागे घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी (ता. 24) मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शेखर गोरेंची समजूत काढून त्यांच्या मागण्यावर अंतिम निर्णय देणार आहेत. 

सातारा  : माण-खटाव तालुक्‍यात जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने लक्ष घालू नये, नियोजन समितीवर तीन जागा आणि जिल्हा  बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याच्या अटीवर शेखर गोरेंनी बंड मागे घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी (ता. 24) मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शेखर गोरेंची समजूत काढून त्यांच्या मागण्यावर अंतिम निर्णय देणार आहेत. 

नियोजन समितीच्या जागावाटपात माण-खटाव तालुक्‍यात शेखर गोरेंना विचारात न घेता राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निर्णय घेतला. तसेच जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याबाबत अजित दादांनी सूचना करूनही त्यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केले. एकुणच माणच्या राजकारणात रामराजेंचा वाढत्या हस्तक्षेपामुळे त्रस्त झालेले राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. 

यासंदर्भात त्यांनी आज आपली भुमिका मांडण्याची तयारी केली होती. पण गुरूवारी (ता. 20 जुलैला) अजित पवार कोरेगाव येथील जरंडेश्‍वर कारखान्यांवर आले होते. त्यावेळी त्यांनी शेखर गोरेंना तेथे बोलावून घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका, वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर अधिवेशनाच्या आधी 24 जुलैला मुंबई शेखर गोरेंच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याची भुमिका यावेळी अजित पवार यांनी घेतली. यासंदर्भात रामराजेंशीही बोलणे झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

यावेळी शेखर गोरेंनी दादांपुढे भुमिका मांडली. ते म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी माझ्यावर माण, खटावची संपूर्ण जबाबदारी दिलेली असताना रामराजेंकडून हस्तक्षेप वाढला आहे. मला विचारत न घेता नियोजन समितीचे उमेदवार ठरविले आहेत. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच जयकुमार गोरेना त्यांच्या गटात, तालुक्‍यात आणि जिल्ह्यातही अडविले आहे. 

केवळ जयकुमार गोरेला थांबविण्यासाठी शेखर गोरे पक्षात हवा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. पक्षातील सर्वांनी मला मदत केली पाहिजे, त्यासाठी नियोजन समितीवर आमचे जिल्हा परिषदेचे दोन व म्हसवड पालिकेतून एक असे तीन सदस्य घ्यावेत, माण-खटाव मध्ये मला विचारल्याशिवाय निर्णय होऊ नयेत. जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून घेणे या तिन निर्णयावर शेखर गोरेंनी आपले बंड मागे घेण्याची भुमिका घेतली आहे. पण यावर येत्या सोमवारी (ता. 24) मुंबईत अजित पवारांसोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. 

संबंधित लेख