satara mahesh shinde may be bjp candidate | Sarkarnama

मोदींच्या 'गुरु भूमी'त महेश शिंदे भाजपचे उमेदवार? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

"घड्याळ्या'च्या काट्यावर "इंजिन' धावू लागले आहे, हे परवाच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. त्यामुळे राजकारणात "धनुष्यबाण' कुणी हाती घेतले, "घड्याळ' आणि त्याचे काटे कुठे चालले, "इंजिना'त कोळसा टाकला किंवा नाही, हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. युवामोर्चाच्या माध्यमातून पक्षांच्या लोकहितार्थ योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवा,' असे आवाहन राष्ट्रीय भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी केले. 

खटाव (सातारा): "घड्याळ्या'च्या काट्यावर "इंजिन' धावू लागले आहे, हे परवाच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. त्यामुळे राजकारणात "धनुष्यबाण' कुणी हाती घेतले, "घड्याळ' आणि त्याचे काटे कुठे चालले, "इंजिना'त कोळसा टाकला किंवा नाही, हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. युवामोर्चाच्या माध्यमातून पक्षांच्या लोकहितार्थ योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवा,' असे आवाहन राष्ट्रीय भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी केले. 

कोरेगाव- खटाव विधानसभा मतदारसंघ कार्यालय उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गेली 60 वर्षे विरोधकांनी खटाव-माणच्या जनतेला पाण्याच्या फक्त आशा दाखवल्या. दुष्काळी भागात पाणी आणण्याची ताकद केवळ भारतीय जनता पक्षात आहे. खटाव- कोरेगाव मतदार संघातील विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवून या भागातील जनतेसाठी पाणी आणण्याची ताकद केवळ महेश शिंदे यांच्यात आहे. असे सांगून श्री. शिंदेंना निवडून देण्याचे आवाहन महाजन यांनी केले. 

कार्यक्रमाला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महेश शिंदे, अतुल कुमार, नरेंद्र राऊत, संतोष जाधव,अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य नीलादेवी जाधव उपस्थित होते. 

महेश शिंदे म्हणाले, "खटावच्या पवित्र भूमीने देशाला लक्ष्मणराव इनामदारांसारखे गुरू दिले. त्याप्रमाणेच भाऊराव कुदळे यांच्या रूपाने आणखी एक रत्न जन्माला घातले. या महान हस्तींच्या विचाराने भाजपचे काम सुरू आहे. निर्व्यसनी आणि कार्यक्षम युवकांची घडण, शेतकऱ्यांचे जीवन समद्ध व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे आदी कामांना प्राधान्य पक्षाच्या माध्यमातून दिले जात आहे. पक्षाने सत्तेवर येताच या दुष्काळी भागासाठी 800 कोटींच्या जिहे- कटापूर योजनेला मान्यता देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.'' 

संबंधित लेख