satara mahadev jankar at jalmandir | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

महादेव जानकर जलमंदीरात; राजमाता कल्पनराजेंशी केली चर्चा! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

"अव्याहतपणे सातारा व राज्याची सत्ता उदयनराजेंच्या पाठीशी राहो', अशा शब्दांत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी खासदार उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या. 

सातारा : "अव्याहतपणे सातारा व राज्याची सत्ता उदयनराजेंच्या पाठीशी राहो', अशा शब्दांत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी खासदार उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या. 

उदयनराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळीच जलमंदीर या निवासस्थानी मंत्री जानकर आले होते. राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जलमंदीर निवासस्थान औत्सुक्‍याने पाहिले. भवानी माता मंदीरात जाऊन दर्शन घेतले. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,"राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी आज आलो आहे. समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचे ते 13 वे वंशज आहेत. त्यांचे भावी आयुष्य सुख, समृध्दीत जावो.' 
 

संबंधित लेख