Satara Jawli Taluka Shivendrasingh raje group dominates grampanchayat elections | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सातारा- जावळी तालुक्‍यात शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातारा  ग्रामपंचायत ठळक वैशिष्ट्ये 


- मायणीत सुरेंद्र गुदगे गटाला धक्का 
- भुईंजमध्ये कॉंग्रेसने गड राखला 
- कवठ्यात सत्तांतर; किकवीत फुलले कमळ 
- फलटणमध्ये 16 सरपंच राष्ट्रवादीकडे 
- जावळीत राष्ट्रवादीच; भाजपला भोपळा 
- शिरवळला राष्ट्रवादी बहुमतात; सरपंचपद भाजपला 
- मलवडीत दोन्ही गोरेंना धक्का; सरपंचपद अपक्षाकडे 
- पाटणमध्ये 25 ग्रामपंचायतींत सत्तांतर 
- गारवडे, नाटोशी, ढेबेवाडीतील सत्तांतर चर्चेचे 
- कृष्णेकाठी मोहिते-भोसलेंचे वर्चस्व कायम 

सातारा  : सातारा व जावळी  तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवून आपली सत्ता अबाधीत राखली. निवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी "सुरूची बंगला' येथे येऊन जावून गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली. 

याबाबतची माहिती 'सुरूची बंगला' येथून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. सातारा तालुक्‍यातील 28 ग्रामपंचायतींसाठी तर, जावली तालुक्‍यातील 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. मंगळवारी सकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी जल्लोष केला. सातारा तालुक्‍यातील सोनगाव आणि साबळेवाडी या ग्रामपंचायती वगळता सर्वच ग्रामपंचायतीवर आमदार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. 

माळ्याचीवाडी, गोगावलेवाडी, भरतगाववाडी आदी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आमदार गटाला आधीच यश मिळाले होते. आसनगाव आणि क्षेत्र माहुली या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडले. याशिवाय खोजेवाडी, आरफळ, राजापुरी, कोंढवली, बोरखळ, सांडवली- केळवली, अपशिंगे, कामेरी, सायळी, शहापूर, वडूथ, मालगाव, नित्रळ, करंजे तर्फ परळी, म्हसवे आदी ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजे गटाने वर्चस्व मिळवले. 

जावळी  तालुक्‍यात शिवेंद्रसिंहराजे गटाने आखाडे वगळता सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. शिवसेनेला केवळ एक ग्रामपंचायत मिळाली. तर, भाजप पुर्णपणे भूईसपाट झाली. कुसुंबी, सोमर्डी, ओझरे, करहर, सरताळे, घोटेघर, रुईघर, वालुथ, मोरघर, भोगवली तर्फ कुडाळ या ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून उर्वरीत ग्रामपंचायती बिनविरोध करण्यातही आमदार गटाने शिष्टाई दाखवली.

 भाजपचे दिपक पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मोरघर ग्रामपंचायतीवर 8-0 असा एकतर्फी विजय मिळवून शिवेंद्रसिंहराजे गटाने पवार गटाचा दारुण पराभव केला. कुसुंबी ग्रामपंचायतीवरही एकतर्फी विजय मिळवून आमदार गटाने विरोधकांना धूळ चारल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

संबंधित लेख