satara hill marethon | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

हिल मॅरेथॉन : नांगरे पाटील, कृष्णप्रकाश, संदीप पाटील धावले ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 सप्टेंबर 2017

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये आज विश्‍वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश, संदीप पाटील हे आयपीएस अधिकारी धावले. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा पूर्ण केली. 

सातारा: सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये आज विश्‍वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश, संदीप पाटील हे आयपीएस अधिकारी धावले. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा पूर्ण केली. 

मॅरेथॉनचे हे सहावे वर्षे असून यावेळेस स्पर्धेत देश विदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. यासोबतच सेलिब्रेटींची उपस्थितीत लक्षवेधी होती. यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोल्हापूरचे पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आदींसह राजकिय व्यक्तीही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच अभिनेता सयाजी शिंदे स्वत: उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी 21 किलोमीटरचे अंतर तीन तास 15 मिनिटात पूर्ण केले. वाटेत अनेकांनी त्यांना थांबवून सेल्फी घेतली. त्यामुळे निर्धारित वेळेत ते मॅरेथॉन पूर्ण करता आली नाही. पण त्यांच्या चाहते व कार्यकर्त्यांनाम मात्र, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेता आला. 

संबंधित लेख