satara girish mahajan on ramraje and ajit pawar | Sarkarnama

रामराजे, अजित पवारांच्या पराक्रमामुळे पाणी आले नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

गेली पंधरा वर्षे जलसंपदा खात्यात धुमाकूळ घातला गेला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या खात्याचे मंत्री असताना योजना पूर्ण झाली नाही. त्यांनी इतके पराक्रम केले, की पैसे तर खर्च झाले; पण पाणी आले नाही. आता गुन्हे दाखल होत आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले ते खरे गुन्हेगार तुमच्या समोर लवकरच येतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला. 

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : गेली पंधरा वर्षे जलसंपदा खात्यात धुमाकूळ घातला गेला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या खात्याचे मंत्री असताना योजना पूर्ण झाली नाही. त्यांनी इतके पराक्रम केले, की पैसे तर खर्च झाले; पण पाणी आले नाही. आता गुन्हे दाखल होत आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले ते खरे गुन्हेगार तुमच्या समोर लवकरच येतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला. 

नांदवळ (ता. कोरेगाव) येथे वसना उपसा सिंचन योजनेचे जलपूजन आज भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने एकत्रितपणे केले. याप्रसंगी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश सागर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, महेश शिंदे, दिगंबर आगवणे, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे उपस्थित होते. 

मंत्री महाजन म्हणाले,"विजय शिवतारे व मी एकत्रपणे काम करत आहोत. युती सरकारने या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. आघाडी सरकारने 15 वर्षांत केवळ चाळीस कोटी रुपये दिले. मात्र, या दोन वर्षांत आम्ही 85 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे ही योजना पूर्ण झाली. त्यासाठी आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याकडे पाठपुरावा केला. पाणी आणि वीज पूर्ण वेळ मिळाली तर शेतकरी कुणापुढे हात पसरणार नाहीत. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारने पाणीपट्टी वीस टक्के इतकी खाली आणली आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करणे हाच सरकारचा मुख्य अजेंडा आहे.'' 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले,"शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते दोन वर्षांत आम्ही करून दाखवले आहे. कमीतकमी पैशात जास्त सिंचनाची कामे जिल्ह्यात झाली आहेत. आता निवडून कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा. त्यामुळे दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने विरोधक बेताल बोलत आहेत. 

संबंधित लेख