satara-friendship-day-mla-makrand-patil-shambhuraj-desai | Sarkarnama

आमदार मकरंद पाटील व शंभूराज देसाईंची मैत्री आजही निखळ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 ऑगस्ट 2018

वाईचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील आणि पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री असेल असे कोणालाही वाटणार नाही. पण अगदी कॉलेज जीवनापासून दोघांच्या मैत्रीला सुरवात झाली. आज दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्रीत कुठेही खंड पडलेला नाही. आजही दोघेजण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. 

सातारा : वाईचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील आणि पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री असेल असे कोणालाही वाटणार नाही. पण अगदी कॉलेज जीवनापासून दोघांच्या मैत्रीला सुरवात झाली. आज दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्रीत कुठेही खंड पडलेला नाही. आजही दोघेजण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. 

दोन राजकारणातील व्यक्तींची मैत्री तशी दुर्मिळच असते. सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची मैत्री पहायला मिळणे अशक्‍यच. पण या अशक्‍यतेला छेद देणारी मैत्री आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील व शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची. या दोघांच्या मैत्रीविषयी फारशी कोणालाच माहिती नाही, असलीच तर ती त्यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांनाच. आज मैत्रीदिनानिमित्त या दोन आमदारांतील मैत्री विषयी जाणून घेतले. 

आमदार मकरंद पाटील म्हणाले, की कॉलेज जीवनापासून आमची मैत्री सुरू झाली. आम्ही जरी वेगवेगळ्या कॉलेजात शिकलो असलो तरी आमची मैत्री कायम होती. आज आम्ही दोघेही आमदार आहोत. तेही वेगवेगळ्या पक्षांचे. आमच्या पक्षीय भुमिका वेगळ्या असल्यातरी पक्षीय राजकारण आमच्या मैत्रीच्या आड कधीच आले नाही. कॉलेज जीवनापासून सुरू झालेली आमच्यातील निखळ मैत्री आजही कायम आहे. आजही आम्ही एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. आमच्या मैत्रीच्या आड कधीही राजकारण येत नाही.

संबंधित लेख