satara-dcc-mla-shivendra-raje-bhosale | Sarkarnama

शासनाचे जिल्हा बॅंके विरोधात आदेश राजकीय हेतूनेच :शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा  
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची नोकर भरती प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच पूर्ण केली आहे. मात्र, बॅंकेतील विरोधी संचालकांनी राजकीय हेतूने व आकसापोटी चुकीच्या आधारावर तक्रारी केल्यामुळे शासनाने बॅंकेच्या विरोधात आदेश दिला आहे.

सातारा  : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची नोकर भरती प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच पूर्ण केली आहे. मात्र, बॅंकेतील विरोधी संचालकांनी राजकीय हेतूने व आकसापोटी चुकीच्या आधारावर तक्रारी केल्यामुळे शासनाने बॅंकेच्या विरोधात आदेश दिला आहे.

केवळ बॅंक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने भाजप सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बॅंकेविरोधात आदेश काढला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, की " जिल्हा बॅंकेने नोकर भरतीची प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेली सर्वसामान्यांची मुले नोकरीला लागल्याचे काही मंडळींना रूचले नाही. त्यामुळे खोडसाळ वृत्तीने त्यांनी नोकर भरती प्रक्रियेनंतर तक्रारी केल्या. आमदार जयकुमार गोरे व अनिल देसाई बॅंकेत विरोधी संचालक आहेत.

आमदार गोरे हे कॉंग्रेसचे तर देसाई भाजपचे असल्याने बॅंकेविरोधात त्यांनी सरकारचा वापर केला आहे. चुकीच्या आधारावर केलेल्या तक्रारीवर राज्याच्या एका राज्य मंत्र्यांच्या मदतीने चौकशी अहवाल बॅंकेविरोधात दिला आहे. वास्तविक बॅंकेचे कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांची नोकर भरती प्रक्रिया नाबार्ड व राज्यस्तरीय कार्यबल यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एसएलटीएफ यांच्या पॅनेलवरील नायबर या मान्यताप्राप्त संस्थेने पूर्ण केली होती.''

संबंधित लेख