Satara DCC Bank to file case in high court | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

जिल्हा बॅंक भरती रद्दच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात जाणार

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 मार्च 2018

उमेदवारांच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून बॅंकेने सहकार सचिवांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरती उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सहकार अतिरिक्त मुख्य सचिवांनी रद्द केली. यामुळे सुमारे 350 उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. उमेदवारांच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून बॅंकेने सहकार सचिवांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

जिल्हा बॅंकेने केलेली नोकर भरती पारदर्शक पध्दतीनेच केल्याचा दावा बॅंकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ करत आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांने घेतलेल्या आक्षेपावरून उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार अतिरिक्त सहकार सचिवांनी हा निर्णय घेतला.

यामुळे लिपिक आणि शिपाई पदाचे साधारणा साडे तीनशे उमेदवार पात्र ठरले होते. त्यांना जिल्हा बॅंकेत काम करताना 240 पेक्षा जास्त दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याने कमी करता येणार नाहीत. त्यामुळे बॅंक सहकार सचिवांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या उमेदवारांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. आता उच्च न्यायालय बॅंकेच्या याचिकेवर काय निर्णय देणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

संबंधित लेख