satara dcc austrelia tour | Sarkarnama

आमदार गोरे बेदखल; राष्ट्रवादीचे संचालक मंडळ ऑस्ट्रेलियाला! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

डेअरी आणि साखर कारखानदारीचा अभ्यास करण्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याच्या विरोधात बॅंकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी भुमिका घेतली आहे. पण गोरेंच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 

सातारा : डेअरी आणि साखर कारखानदारीचा अभ्यास करण्यासाठी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्याच्या विरोधात बॅंकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी भुमिका घेतली आहे. पण गोरेंच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 

जिल्हा बॅंकेवर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अध्यक्ष आहेत. सभासदांना डेअरी आणि साखर कारखानदारीतील अधुनिक तंत्रज्ञान समजावे, यासाठी संचालक मंडळ ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये हा दौरा होणार आहे. या दौऱ्यात संचालक ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड मधील दूग्ध व्यवसायातील अधुनिकता आणि साखर कारखानदारी, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व त्यांची यशस्वीता याचा अभ्यास करणार आहेत. या अभ्यास दौऱ्यानंतर हे संचालक आपापल्या भागात अशा पध्दतीचे कृषी प्रक्रिया उद्योग व अधुनिक डेअरी फॉर्म उभे करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहेत. त्यामुळे बॅंकेच्या संचालकांचा हा दौरा विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. 
पण या दौऱ्यास बॅंकेचे संचालक व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधाची भुमिका घेतली आहे. त्यांच्यामते हा दौरा म्हणजे बॅंकेच्या पैशाचा अपव्यय आहे. त्यामुळे आमदार गोरेंच्या या भुमिकेमुळे जिल्हा बॅंकेच्या संचालकांचा परदेश अभ्यास दौरा अलिकडे चर्चेचा विषय ठरला आहे. 

संबंधित लेख