satara cm on udyanraje | Sarkarnama

उदयनराजे राष्ट्रवादीचे असलेतरी ते 'मुक्‍त' आहेत : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

उदयनराजे भोसले हे मुक्त विद्यापीठ असून त्याचे नियमही तेच करतात आणि त्याची अंमलबजावणीही तेच करतात. प्रेमाला प्रेम देणारे आणि अन्याया विरोधात हल्लाबोल करणारे ते राजे आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

सातारा : उदयनराजे भोसले हे मुक्त विद्यापीठ असून त्याचे नियमही तेच करतात आणि त्याची अंमलबजावणीही तेच करतात. प्रेमाला प्रेम देणारे आणि अन्याया विरोधात हल्लाबोल करणारे ते राजे आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाला. यावेळी खासदार शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. 

कार्यक्रमस्थळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमदार शंभूराज देसाई यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मान्यवरांचे सत्कार स्वतः उदयनराजे यांनी केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मंचाला कुठलाच पक्ष आणि समाजाचे बंधन नाही. कारण तमाम महाराष्ट्राचे प्रेम आहे. ते जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते एक मुक्त विद्यापीठ आहे. ते स्वतःचा नियम तयार करतात, त्याची अंमलबजावणी तेच करतात. त्यांच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांना शासन ही तेच करतात. तमाम जनता त्यांच्यावर प्रेम करते. प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्याया विरोधात हल्लाबोल करणारे राजे आहेत. वाढदिवसासाठी त्यांनी विकासकामांना प्रधान्य दिले. ते नेहमी माझ्याकडे येतात पण ते जनतेची विकास कामे घेऊन येतात. हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे. त्यांच्या वर महाराज म्हणून आम्ही प्रेम करतो. अजिंक्‍यतारा किल्यासाठी 25 कोटी, सातारचे हद्दवाढ व मेडिकल कॉलेजची मागणी त्यांनी केली आहे, ती आम्ही लवकरच पूर्ण करू. 

संबंधित लेख