राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजप नेत्यांचे मौन 

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा साताऱ्यातून पुढे गेली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी भाजपवर टिकेची झोड उठविली. पण भाजपच्या स्थानिक एकाही नेत्याने या टिकेला प्रतिउत्तर करण्याचे धाडस दाखविले नाही. सातारा जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी मौन का धरले, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजप नेत्यांचे मौन 

सातारा : राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा साताऱ्यातून पुढे गेली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी भाजपवर टिकेची झोड उठविली. पण भाजपच्या स्थानिक एकाही नेत्याने या टिकेला प्रतिउत्तर करण्याचे धाडस दाखविले नाही. सातारा जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी मौन का धरले, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

या यात्रेदरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर व राज्य आणि केंद्रातील कारभारावर अक्षरशा सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, यांच्यासह दिग्गज नेत्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडसुख घेतले. 

केंद्र व राज्यातील भाजप सरकार कसे अपयशी ठरले आहे, याचे पाढेही वाचले. कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप, शिवसेना व मित्र पक्षाच्या सरकारवर टिकेची झोड उठवली. सातारा जिल्ह्यात तब्बल सहा सभा घेऊन राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा पुण्याकडे रवाना झाली. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या या टिकेला जिल्ह्यातील एकाही भाजपच्या नेत्याने उत्तर द्यायचे धाडस दाखविले नाही.

जिल्ह्यात भाजपने अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांना राज्यमंत्री दर्जा असलेली पदे दिली आहेत. तसेच जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात निधीही मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपलब्ध केला आहे. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टिका होत असताना भाजपचे शिलेदार मौन धारण करून का बसले आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. पाणी प्रश्‍नावर सातत्याने आवाज उठविणारे भाजपचे नेते व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर हे मुलुख मैदानी तोफ मानली जाते. त्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रतिउत्तर केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे नेमके मौन कशासाठी असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com