satara akshaykumar about mumbai police | Sarkarnama

विश्‍वास पाटील 'थॅंक्‍यू'; मुंबई पोलिसांमुळे मराठी शिकलो : अक्षयकुमार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सर्वात पहिले मला विश्‍वास पाटील यांना थॅंक्‍यू म्हणायचे आहे, मला मराठी चांगले येते ना? अशी सुरवात करत अक्षयकुमारने धमाल उडवून दिली. तो म्हणाला, "मुंबई पोलिसांमुळे मी मराठी बोलायला शिकलो. मोटार चालवत असताना मुंबई पोलिसांनी मला अडविले आणि लायसन्स विचारले. मी इंग्रजीत बोलू लागतो तेव्हा त्या पोलिसांनी मराठी शिका, असा सल्ला दिला होता.' 

सातारा : सर्वात पहिले मला विश्‍वास पाटील यांना थॅंक्‍यू म्हणायचे आहे, मला मराठी चांगले येते ना? अशी सुरवात करत अक्षयकुमारने धमाल उडवून दिली. तो म्हणाला, "मुंबई पोलिसांमुळे मी मराठी बोलायला शिकलो. मोटार चालवत असताना मुंबई पोलिसांनी मला अडविले आणि लायसन्स विचारले. मी इंग्रजीत बोलू लागतो तेव्हा त्या पोलिसांनी मराठी शिका, असा सल्ला दिला होता.' 

पोलीस विभागाच्या युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीनिमित्त अभिनेता अक्षयकुमार आज साताऱ्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात ही स्पर्धा होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक विजय पवार उपस्थित होते. 

अक्षयकुमार म्हणाला, महिला या स्वतःच्याच दुश्‍मन आहेत. मेडिकल मध्ये गेल्या तरी सॅनिटरी पॅड लपूनछपून मागतात. पाळी ही भगवंताने दिलेली देणं आहे. सर्वांचा जन्म त्यातूनच होतो. महिलांचे ध्यान राखणे हेच पुरुषांचे कर्तव्य आहे. महिला सामर्थ्यवान झाल्या तर देश सामर्थ्यवान बनेल. भारतातील 82 टक्‍के महिला सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. परिणामी, भविष्यात 20 टक्‍के महिला कर्करोगाला बळी पडत असतात. महिलांनी मासिक पाळीची काळजी घेतली पाहिजे. 82 टक्‍क्‍यांचे प्रमाण 72 टक्‍केवर आले तरी ते माझ्या चित्रपटाचे यश मानेन. "पॅडमॅन' हा केवळ चित्रपट नाही तर ती चळवळ आहे. भारत सरकारबरोबर वर्ल्ड बॅंकेने करार केला असून, लवकरच सहा लाख 780 गावांमध्ये हा चित्रपट मोफत दाखविला जाणार आहेत. यापुढे महिलांच्या समस्यांवर जास्त चित्रपट बनविणार आहोत, असेही अक्षयकुमारने सांगितले. 

 

संबंधित लेख