satara | Sarkarnama

दोन पालकमंत्री घेणार टंचाईचा आढावा 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 एप्रिल 2017

जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाय योजना आखण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री विजय शिवतारे व सह पालकमंत्री सदाभाऊ
खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात दोन पालकमंत्री टंचाईवर उपाय योजना काढण्यात यशस्वी होणार का, याचीच उत्सुकता आहे. 

सातारा : जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाय योजना आखण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री विजय शिवतारे व सह पालकमंत्री सदाभाऊ
खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात दोन पालकमंत्री टंचाईवर उपाय योजना काढण्यात यशस्वी होणार का, याचीच उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच तालुकानिहाय टंचाई आढावा बैठका घेऊन संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याची टंचाई आढावा
बैठक गुरुवारी पालकमंत्री विजय शिवतारे व सह पालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्यात एकमेव शिवसेनेचा आमदार वगळता उर्वरित
सात आमदार हे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे आहेत. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील टंचाईच्या प्रश्‍नावर
होणाऱ्या बैठकीत दोन पालकमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांच्या नाकावर टिच्चून टंचाई परिस्थिती कुशलतेने हाताळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहिल्यास पालकमंत्री विजय शिवतारेंची अडचण होणार आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार
प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून पालकमंत्र्यांचे मनसुबे धुळीला मिळविण्याचा प्रयत्न करतील. या सर्व जुगलबंदीत टंचाईचे तीनतेरा वाजणार नाहीत, याची काळजी
सर्वांना घ्यावी लागणार आहे. 
 
 

संबंधित लेख