तहानलेल्या बिजोरसेसाठी सरपंच जया सावलांनी शेत पडीक ठेऊन गावासाठी खुली केली विहिर

बागलाण तालुक्यातील आसखेड़ा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनता हंडाभर पाण्यासाठी हैराण आहे. गावातील विहिरी आटल्याने त्यावर उपाय म्हणून अखेर सरपंच श्रीमती जया सावला यांनी पुढाकार घेत स्वतःची विहीर गावासाठी खुली करीत एक आगळे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
तहानलेल्या बिजोरसेसाठी सरपंच जया सावलांनी शेत पडीक ठेऊन गावासाठी खुली केली विहिर

बिजोरसे : बागलाण तालुक्यातील आसखेड़ा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनता हंडाभर पाण्यासाठी हैराण आहे. गावातील विहिरी आटल्याने त्यावर उपाय म्हणून अखेर सरपंच श्रीमती जया सावला यांनी पुढाकार घेत स्वतःची विहीर गावासाठी खुली करीत एक आगळे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. 

जिल्ह्यातील प्रगत तालुका बागलाणच्या चार हजार लोकवस्तीच्या या गावाची स्थिती अक्षरशः 'नदी उशाशी परंतु कोरड घशाशी' अशी झाली आहे. तालुक्यातील सर्वाधीक बागायतदार शेतकरी व शेती असेलेले गाव अशी या गावाची ख्याती होती. सलग तीन वर्षे गारपिट झाल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला व त्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिति नाजुक झाली. आजवर अनेक राजकीय नेत्यांनी सत्ता उपभोगली. मात्र, नियोजन चुकल्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन चार दिवसा आड पाणीपुरवठा होत होता. सामान्य नागरीक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसतात. 

सरपंच श्रीमती सावला यांनी याबाबत पंचायत समिती, शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अशा स्थितीत त्यांनी पुढाकार घेत स्वतःची विहिर गावासाठी खुली केली. गावाला रोज एक लाख लिटर पाण्याची गरज आहे. या विहिरीतुन सध्या सत्तर हजार लिटर पाणी उपलब्ध होते. लाखाचे उत्पन बाजूला ठेवून शेत पडीक ठेऊन त्यांनी गावाची तहान भागवली. या कामात त्यांना कुुटंबातील राजेन्द्र सावला, भाऊसाहेब सावला, दीपक कापडनिस यांनी सहकार्य केले. 

स्व. विजय सावला यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेसाठी स्वतःच्या विहिरिचे पाणी गावास उपलब्ध करुन दिले. आगामी काळात गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर 
प्रयत्न करणार आहे. - श्रीमती जयाताई सावला, सरपंच - आसखेड़ा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com