sarpanch murder | Sarkarnama

सेनेच्या सरपंचाची कवठेमहांकाळमध्ये हत्या 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मे 2017

सांगली : हरोली (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या दरम्यान निघृण हत्या करण्यात आली.

शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर तात्या पाटील यांचे ते बंधू होते. 
पाटील हे देशिंग येथून हरोलीतील आपल्या घरी चारचाकी इनोव्हा गाडीतून जात होते. दरम्यान वस्तीवरील घरासमोर गाडी लावून ते निघाले असताना अंधारात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्‍यात व मानेवर वार केल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर गावात तणाव आहे. 

संबंधित लेख