Sarpach Can Work Better than MP Says Sanjay Raut | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

...तर सरपंच खासदारापेक्षाही चांगला : संजय राऊत 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

ग्रामपंचायतीचा कारभार करतांना विकासाला प्राधान्य हवे. त्याचा राजकारणाचा अड्डा होता कामा नये. सरपंचांनी निष्पक्षपणे विकासाचा ध्यास घेतला, तर तो खासदारापेक्षाही चांगला ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यसभेतील नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केले.

नाशिक : ग्रामपंचायतीचा कारभार करतांना विकासाला प्राधान्य हवे. त्याचा राजकारणाचा अड्डा होता कामा नये. सरपंचांनी निष्पक्षपणे विकासाचा ध्यास घेतला, तर तो खासदारापेक्षाही चांगला ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यसभेतील नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केले.

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातील सरपंचांची सरपंच संसद झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''सरपंचपदावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अनेकजण पुढे संसदेत गेले. मंत्री झाले. त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. सरपंचपदावर काम केल्याने त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तम जाण असते. ग्रामपंचायतीपासून राजकारणात आले तर चांगले काम होऊ शकते. सरपंच प्रशिक्षित असेल, तर आदर्श गावे होतील." अशा वेळी आदर्श गाव स्पर्धा घेण्याची गरज पडणार नाही, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. 

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संचालक राहुल कराड, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, संयोजक खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार नरेंद्र दराडे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, लोकसभा मतदारसंघप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा धांदोळा- 2019 चा वेध - आजच मागणी नोंदवा सरकारनामा दिवाळी अंकाची - सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख