sarkarnamas first diwali issue set to stir-state-politics | Sarkarnama

सरकारनामाचा पहिला दिवाळी अंक राजकारण ढवळून काढणार

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुणे : राजकीय घडामोडींची पडद्यावरची आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या `सरकारनामा` या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंक बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे.

सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी "सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी "सरकारनामा'च्या दिवाळी अंकामध्ये आहे.

दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये

  •     महासर्वेक्षण-  आज निवडणूक झाली तर? 
  •     कोण ठरणार हुकुमाचा एक्का - २०१९ ला कोणाची भूमिका ठरणार निर्णायक?  गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत सरकारनामाच्या टिमने केलेले सर्वेक्षण. ते देखील त्याच्या   सुलभ अशा विश्लेषणासह.
  •     महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणातले प्रभावी तरुण चेहऱ्यांची ओळख. राज्यातील    भविष्यातील नेत्यांचे आता काय चालले आहे, याचा घेतलेला मागोवा.
  •     महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीः मुख्यमंत्री पदावर असताना ते काय शिकले? सहभागः शरद पवार, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस
  •     चुरशीच्या लढती- २०१९ ची निवडणूक अनेक अर्थांनी गाजणार आहे. राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार याचा वृत्तांत.
  •      

याशिवाय देश-विदेश मधील राजकीय घडामोडी, राजकीय किस्से, राजकारणातील घराण्यांची ओळख. थोडक्यात राजकारणाविषयी सबकुछ माहिती करून घ्यायची असेल तर हा अंक संग्रही हवाच.

`सरकारनामा`चा हा अंक तुम्ही सहज घरपोच मागवू शकता. तो अॅमेझाॅनवरही उपलब्ध आहे. त्याची लिंक सोबत आहेच.  तेव्हा त्वरा करा आणि आपली मागणी आजच नोंदवा. सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w

अधिक माहितीसाठी  91300 88459 या क्रमांकावर व्हाॅटस् अप्प करा किंवा webeditor@esakal.com शी संपर्क साधा.

संबंधित लेख