Sarkarnama Impact :Personal assistant of social justice state minister transferred | Sarkarnama

सरकारनामा इंपॅक्ट : सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाची उचलबांगडी

गोविंद तुपे  :  सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई  :    मंत्रालय संवर्गातील प्रतिनियुक्तीवरील उपसचिव दर्जाची रिक्त पदाच्या आरक्षणाला मॅटमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे खासगी सचिव रमेश मनाळे आणि इतर अधिका-यांनी आव्हान दिले होते. याप्रकारामुळे मंत्रालयातील अधिकारी आक्रमक झाले होते.

 सरकारनामाने हा संताप उघड केल्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालायतील अधिका-यांची बैठक घेतली. आणि माझ्या अपरोक्ष अशा पध्दतीचे काम करणारे रमेश मनाळे यांना आपण खासगी सचिव पदावरून पायउतार करीत असल्याचे अधिकायांच्या बैठकीत जाहीर केले. 

मंत्रालयात १२८ उपसचिव दर्जाची पदे आहेत. त्यातील प्रतिनियुक्तीच्या २३ पदांना आरक्षण लावण्यात येऊ नये अशी मागणी करीत मनाळे आणि इतर अधिका-यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाने आरक्षणाला मॅटमध्ये अाव्हान दिल्याबाबत मंत्रालयातील अधिकारी आक्रमक झाले होते. 

मनाळे यांच्या विरोधात मंत्रालयातील अधिका-यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे तक्रार करून बैठकही लावून घेतली होती.तसेच या संबधित अधिका-यांवर कारवाईची मागणीही केली होती.

यासर्व प्रकाराला एक आठवडा उलटल्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयातील अधिका-यांची बैठक बोलवली. अधिका-यांशी चर्चा झाल्यानंतर राज्यमंत्री कांबळे यांनी आपण आपले खासगी सचिव रमेश मनाळे यांना कार्यमुक्त करत असल्याचे अधिका-यांच्या बैठकीत जाहीर केले.

संबंधित लेख