भल्याभल्यांना घायाळ करणारी डान्सर सपना चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर ? 

भल्याभल्यांना घायाळ करणारी डान्सर सपना चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर ? 

नवी दिल्ली : आपल्या दिलखेचक नृत्याने भल्याभल्यांना घायाळ करणारी हरियातील लोकप्रिय नृत्यांगणा सपना चौधरी लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी सपना यांचे दिल्लीत आल्या आहेत. 

सपना चौधरी यांनी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या काल येथील कॉंग्रेस कार्यालयात आल्या होत्या. हरियातील आबालवृद्धांमध्ये सपना इतक्‍या लोकप्रिय आहेत की त्यांचे नृत्य सुरू झाले प्रत्येकजण ठेका धरतो. सोनिया आणि राहुल यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. कॉंग्रेस नेत्यांच्या गाठीभेटीविषयी सपना यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "" सध्या तरी मी राजकारणात जाण्याचा विचार केला नाही. पण, भविष्यात मी कॉंग्रेसचा प्रचार करू शकते आणि राजकारणातही येऊ शकते.भविष्यात काय होईल हे देवाच्या कृपेने होईल. कॉंग्रेस मुख्यालयात आले त्याचे कारण असे आहे की माझ्या ज्ञानात राजकारणाविषयी थोडी भर पडू शकते.'' 

खरं सांगायचं तर मला सोनियाजी, प्रियांका आणि राहुल हे तिघेही खूप आवडतात. मला कॉंग्रेसचे आकर्षण आहे. कॉंग्रेसच्या या तिन्ही नेत्यांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती. गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसने देश सांभाळला आहे. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांनी कॉंग्रेसला मत द्यावे असा अर्थ होत नाही. माझा आवडीचा पक्ष वेगळा आणि माझी कला वेगळी. एक कलाकार म्हणून सर्वच पक्षाचे लोक माझ्या प्रेम करतात माझ्या कलेला दाद देतात असेही सपना चोैधरी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com