Sanjivraje Naik Nimbalkar selected as president of state Kho- Kho association | Sarkarnama

राज्य खो - खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर

सरकारनामा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

 संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा खो खो असोसिएशनच्या स्थापनेपासून संघटनेत कार्यरत आहेत.

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग सभागृहात माजी उपमुख्यमंत्री व राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) असोसिएशची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेचे निरिक्षक राजस्थानचे असगर अली तसेच महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष विजय संतान हे होते.

 संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा खो खो असोसिएशनच्या स्थापनेपासून संघटनेत कार्यरत आहेत. ते जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या सभेत सर्वानुमते संजीवराजे यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील खो खो संघटक पी. जी. शिंदे यांची उच्चस्तरीय सल्लागार समितीवर तसेच खो खो प्रशिक्षक महेंद्र गाडवे यांची शासकिय परिषद पदी निवड झाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख