sanjayraut samana | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

अयोध्या खटल्यात संजय राऊत यांना सीबीआयचे समन्स

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम प्रकरणी न्यायालयाने नोटीस दिली असून जूनला संजय राऊत यांना लखनौ कोर्टात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. 

6 डिसेंबर 1992 साली अयोध्या येथे असलेल्या बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली होती. त्यानंतर देशभरात हिंसाचार उफाळून आला होता. बाबरी मशीद पतन प्रकरणात सामना वर्तमानपत्राला जबाबदार धरण्यात आलेले आहे. त्यावेळी सामनामधून या प्रकरणाचे उघड समर्थ करण्यात आले होते. सामनामधून प्रक्षोभक लिखाण केल्यामुळे 23 जूनला लखनौ कोर्टात हजर राहण्याचे आदेश "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊतांना देण्यात आले आहेत. याबाबत "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहे. 

संबंधित लेख