मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते घराण्याला भाजपची उमेदवारी मिळणार असेल तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून माढ्याच्या शिंदे घराण्यातील उमेदवार येण्याची दाट शक्यता आहे.
मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

पुणे : रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाण्याचा स्पष्ट झाल्याने आता दुसरीकडे संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीतून माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ गेले काही दिवस राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा होती. या चर्चेत स्वाभाविकपणे विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव अग्रभागी होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव रणजितदादा यांचे नाव चर्चेत आले. तरीही यावर निर्णय झाला नाही. अखेरीस मोहिते घराण्याने कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. मोहिते पाटील भाजपात गेल्याने त्यांना येथून तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट आहे.

मोहिते राष्ट्रवादीत गेल्यानंतर या पक्षाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मोहिते आणि आमदार बबनदादा शिंदे या दोन घराण्यांत राजकीय स्पर्धा आहेच. शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. शरद पवार हे माढ्यातून उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिंदे यांनी पवारांची भेट घेऊन आपण राष्ट्रवादीला सहकार्य करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे शिंदे यांच्या नावाचा विचार जास्त होऊ शकतो, याची शक्यता आहे.

दुसरीकडे प्रभाकर देशमुख हे आधीपासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या पाठिमागे माढ्यातील इतर दिग्गज राजकारणी उभे राहणार का, त्यावर त्यांच्या उमेदवारीचे गणित ठरेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com