सांगलीत भाजपकडून  खासदार संजय पाटीलच ? 

सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्याचे वृत्त आहे. आज रात्री भाजपकडून त्याची घोषणा होईल, अशी माहिती समोर येतआहे.
सांगलीत भाजपकडून  खासदार संजय पाटीलच ? 

सांगली :  सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्याचे वृत्त आहे. आज रात्री भाजपकडून त्याची घोषणा होईल, अशी माहिती समोर येत असून त्यादृष्टीने खासदार गटात हालचाली गतीमान झाल्या आहेत. श्री. पाटील यांची उमेदवारी अडचणीत असल्याचे तर्क त्यांचे विरोधक मांडत होते, मात्र त्यांच्याविरुद्धची भाजप आमदारांची नाराजी दूर करण्यात पक्षनेतृत्वाला यश आल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

सन 2014 साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी घेत विक्रमी मताधिक्‍याने खासदार झालेल्या संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपमधील काही गट खासदारांवर नाराज असल्याची चर्चा होत आली आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख विविध कारणांनी श्री. पाटील यांच्यावर नाराज होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी केल्याचीही माहिती पुढे आली. या पार्श्‍वभूमीवर भाजपची यादी लांबली. 

त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारी शंका-कुशंका घेतल्या जाताहेत. 'उमेदवारी कापली जाईल', अशा आशयाच्या बातम्यांना भाजपचेच कार्यकर्ते सोशल मिडियावर पसरवत आहेत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. आता मात्र खासदार पाटील यांचेच नाव उमेदवारीसाठी निश्‍चित झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या गटात सध्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे. भाजपकडून आज रात्री राज्यातील काही मतदार संघांचे उमेदवार जाहीर केले जातील, अशा आशयाचे वृत्त आहे. त्यात सांगलीचा समावेश असून खासदार पाटील यांच्या नावाचा त्यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com