मिशन अयोध्येमुळे संजय राऊत याचे प्रस्थ वाढले ,वरिष्ठ शिवसेना नेते अस्वस्थ

राममंदिरासाठी हाती घेतलेले अभियान केवळ राऊतयांच्या इच्छेनुसार चालते आहे त्यामुळे अन्य नेते, मंत्री अस्वस्थ झाले आहेत.
Raut_
Raut_

मुंबई : मिशन अयोध्येच्या निमीत्ताने शिवसेनेला सेंटर स्टेजवर आणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे खुश असल्याचे समजते .पण या मिशन अयोध्येमुळे संजय राऊत याचे प्रस्थ शिवसेनेत  वाढल्याने  वरिष्ठ शिवसेना नेते  अस्वस्थ आहेत . 

शिवसेनेचे मिशन अयोध्या  संपूर्णत: संजय  राऊत   यांच्या निर्देशानुसार होत असल्याने ज्येष्ठ नेते संपूर्णत: अस्वस्थ झाले आहेत. मनोहर जोशी,लीलाधर डाके,दिवाकर रावते या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अयोध्येला येवू नका असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीवर बोलावून दिले आहेत.

राममंदिर अभियानाच्या निमित्ताने पक्षसंघटनेला बळकटी यावी यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय  आरती आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अयोध्येत उदधव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी धर्मगुरू हजर होणार आहेत. त्या सर्वांशी संपर्क साधण्याचे कार्य संजय  राऊत   यांनी केले आहे.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक ,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ,पोलिस खाते यासर्वांशी संपर्क साधण्याचे काम  खासदार संजय राऊत यांनीच केले आहे.राममंदिरासाठी हाती घेतलेले अभियान केवळ  राऊत   यांच्या इच्छेनुसार चालते आहे त्यामुळे अन्य नेते, मंत्री अस्वस्थ झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com