Sanjay Raut taunts Cm over alliance praposal | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या युती प्रस्तावावर संजय राऊतांचा टोमणा 

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

शिवसेनेवरचे प्रेम उतू का जाते आहे?  भावना उचंबळून का येताहेत ? ते आम्हाला कळतेय.

- संजय राऊत

मुंबई :  "चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेबददलच्या भावना उचंबळून आल्या आहेत." असा टोमणा शिवसेना सांसदीय पक्षाचे नेते संजय राउत यांनी  मारला आहे. 

चार वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पत्रकारांशी बातचित करताना शिवसेना आणि भाजप लोकसभा विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरी जाईल असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त  केला होता .

त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना खासदार  संजय राऊत म्हणाले, "आम्ही चार वर्षांचा कारभार पहातो आहे. शिवसेनेवरचे प्रेम उतू का जाते आहे?  भावना उचंबळून का येताहेत ? ते आम्हाला कळतेय. आमच्या भावना उचंबळून येताहेत का ते नंतर ठरवू.

याचा अर्थ तुम्ही युती करणार काय असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले," आम्ही आमच्या भावना स्पष्ट केल्या आहेत,पुन्हा एकदा करू पण योग्यवेळी".

 

संबंधित लेख